वरोरा:तिसरे ओपन जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत २०२४, तायक्वांडो असोसिएशनच जिल्हा चंद्रपूर व्दारे आयोजित डि.के. तायक्वांडो असोसिएशन सिंदेवाही च्या वतीने चंद्रपूर जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत २०२४ घेण्यात आले. या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने तायक्वांडो असोसिएशन वरोराच्या टिम ने सर्वाधिक यश मिळाले आहे त्यात खुशी किन्नाके (सुवर्ण पदक),विधी भोगेेकर (सुवर्ण पदक), कनक सावसाखडे (कास्यपदक), समंथा ताजणे (रजत पदक)विर निखाडे (कास्य पदक), कावेरी किन्नाके (रजत पदक),अर्निका मडावि (रजत पदक), संस्कार वारे (कास्य पदक), वरद झाडे(कास्य पदक), वस्तिक वारे (कास्य पदक), स्वरीत पाटील (रजत पदक), युगांत भांडकर (कास्य पदक) अशा ऐकून १२ खेळाडू नी यश मिळविले आहेत.
या सर्व खेळाडू ना प्रशिक्षण देणारे श्री. अक्षय हनुमंने यांचाही विशेष मोलाचा वाटा आहे. सदर विद्यार्थी आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर सदैव तायक्वांडोची तयारी करत असतात याकरिता सर्व खेळाडूचे, तायक्वांडो प्रशिक्षकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे, व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख तानाजी बायस्कर, आयोजक मान्यवरांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.