HomeBreaking Newsआनंद निकेतन महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

आनंद निकेतन महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

वरोरा- नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले. महाविद्यालयाचा एकूण निकाल 96.22 टक्के असून विज्ञान शाखेचा निकाल 98.75% लागला .कला शाखेचा निकाल ८६.१३ टक्के व वाणिज्य शाखेचा निकाल 97.19% लागला विज्ञान शाखेतून ओम कापसे हा विद्यार्थी 94.83% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला. कला शाखेतून कुमारी सानिका खामकर 85.33% गुण घेऊन व वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमातून पियुष नीरसकर हा 93 टक्के गुण घेऊन प्रथम आला.वाणिज्य मराठी माध्यमातून कु .रोहिणी कुंभारे 85.17 टक्के गुण मिळवून प्रथम आली.विज्ञान शाखेचे 18 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी घेऊन उत्तीर्ण झालेत तर वाणिज्य शाखेचे 14 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले. एकंदर उत्तम निकालाची परंपरा यावर्षीही आनंदनिकेतन महाविद्यालयाने कायम ठेवली. सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे उपप्राचार्य राधा सवाने व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!