Homeचंद्रपूरआ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन. 

आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन. 

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी (ता.प्र) :– गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी राजेश विश्वनाथ झाडे वय ४७ वर्ष यांनी सततची नापिकी, कर्ज आणि वैयक्तिक अडचणी यामुळे नैराश्य येऊन विष प्राषण करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुली, १ मुलगा आणि परिवारजण आहेत. कुटुंबातील करता व्यक्ती आत्महत्या करून मरण पावल्याने त्या कुटुंबावर फार मोठे संकट उभे राहिले. या घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. आ. सुभाष धोटे यांनी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली. तसेच तहसीलदार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष देऊन मृतक कुटुंबीयांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे निर्देश दिलेत.

या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकार, कृषी अधिकारी पानसरे, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेशनकर, सरपंच अर्पणा रेचनकर, उपसरपंच जीवन अलोने, ग्रा. प. सदस्य कुसुम अलोने, पोलीस पाटील तुळशीराम काळे, भाग्यश्री मुद्द्यमवार, शंकर सोनटक्के, सिंधुताई अलोने, पंकज खर्डीवार, राकेश मुंजनकर, वसंत चिताडे, राजेश्वर पिपरे यासह स्थानिक नगरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!