गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले गोंडवाना विद्यापीठाचे मानव्य विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. ऐ. चंद्रमौली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ही विद्यार्थ्याच्या सर्वांनी विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यांची अंमलबजावणी या वर्षीपासून होत आहे या धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या आवडीनुसार व कलानुसार त्याला विषयाची निवड करता येईल.
या धोरणाची अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी हे धोरणसमजून घ्यावे विद्यार्थीनी विद्यापीठांनी तयार केलेल्या बास्केटनुसार महाविद्यालयाने आपले स्वतंत्र बास्केट तयार करून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य द्यावं असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन चंद्रमौली यांनी केले. या कार्यशाळेच्या उद्घाटक व अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मुलचे सचिव एडवोकेट अनिल वैरागडे, माता कन्यका शिक्षण संस्थेचे सचिव राजेश्वरजी सुरावर प्राचार्य डॉ हिराजी बनपुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांनी केले.
या कार्यशाळेला विविध महाविद्यालयातील शंभर प्रतिनिधी उपस्थित होते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी करत असताना संशोधन आणि कौशल्य विकास अतिशय महत्त्वाचा असून नवी पिढी सक्षम बनवण्यासाठी कार्य करणे गरजेचे असून नवनवीन ज्ञानाच्या निर्मितीमध्ये प्राध्यापकांनी आपली ऊर्जा खर्च करावी असे महत्त्वाचे विधान डॉ ऐ. चंद्रमौली यांनी केले. या कार्यशाळेचे संचालन डॉ. राम वासेकर यांनी केलं तर आभार प्रा. संदिप देशमुख यांनी मानले या कार्यशाळेच्या यशस्वीकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.