Homeचंद्रपूर2 जुन रोजी अल्कोहोलिक अनॉनिमस नवचेतना समुह, घुग्घुस यांचा पाचवा वर्धापन दिन

2 जुन रोजी अल्कोहोलिक अनॉनिमस नवचेतना समुह, घुग्घुस यांचा पाचवा वर्धापन दिन

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)

घुग्घुस-अल्कोहोलीक्स अनाॅनिमस या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या नवचेतना समुह घुग्घुस येथे स्थापन होऊन पाच वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्धापनदिन निमित्त दिनांक 2 जुन 2024 रोजी रविवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत ” मद्यपाश एक आजार ” या विषयावर जनजागृती सभेचे आयोजन जनता विद्यालय घुग्घुस येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्यात अल्कोहोलीक्स अनाॅनिमसची मुहुर्तमेढ रोवनारे डॉ प्रमोद महाजन,(माजी ए क्लास ट्रस्टी जी एस ओ इंडिया) हे उपस्थीत राहणार असून अतिथी म्हणून डॉ. डी सी आनंद, मेडिकल ऑफिसर, राजीव रतन हाॅस्पीटल घुग्घुस, व श्री शाम सोनटक्के, पोलीस निरीक्षक, घुग्घुस हे उपस्थीत राहुन मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तुलसीदास के, चेअरमन, शाम सी. सेक्रेटरी, रामू पी. कोषाध्यक्ष यांनी केले आहे

याच दिनाचे औचित्य साधुन नवचेतना समुहाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यक्रमा करीता विदर्भातील प्रमुख शहरातुन व गावातून अल्कोहोलीक्स अनाॅनिमसचे सभासद हजर राहणार आहे. उपरोक्त वर्धापनदिन कार्यक्रमास मद्यपीडीत व त्यांच्याशी संबधित व्यक्तींनी या कार्यक्रमास उपस्थीत राहण्याची विनंती नवचेतना समुहाचे योगेश एन, अतुल बी, केशव टी, योगेश बी, मंगेश के, यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!