Homeचंद्रपूरराजुरासमाजभूषण व पर्यावरण मित्र पुरस्काराने विशाल शेंडे सन्मानित पर्यावरण संवर्धन व...

समाजभूषण व पर्यावरण मित्र पुरस्काराने विशाल शेंडे सन्मानित पर्यावरण संवर्धन व विकास समिती बल्लारपूरचे  आयोजन…

राजुरा: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य बलापूरच्या वतीने ९ जून रोजी एकदंत सभागृह येथे भव्य विदर्भस्तरित पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल विशाल शेंडे यांना शाल, रोपट आणि सन्मानचिन्ह देऊन समाजभूषण व पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजूरा तालुक्यातील जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे मागील सात वर्षापासून वाचनालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा उपक्रम स्वच्छता दिन जागृती वृक्षारोपण रक्तदान शिबिर तंबाखू व्यसनमुक्ती पर जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन एड्स जनजागृती रॅली, राखी रक्षाबंधन, लॉकडाऊन च्या काळात वेगवेगळे सामाजिक उपक्रम तसेच सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणदानाचे कार्य असे अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल विशाल शेंडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सध्या स्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वृक्षतोड होत असल्याने तापमानातही वाढ झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे. औद्योगिकीकरण, कारखान्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.नागरिक अनेक आजाराला बळी पडत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनीनी कार्य करावे असे मार्गदर्शनातून कळविले.यासाठी झाडे लावून,झाडांचे जतन व संवर्धन करणे गरजचे आहे. कार्यक्रमप्रसंगी उद्घाटक म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार,अध्यक्ष डी. के. आरीकर,घनश्याम मुलचंदानी, डॉ. अभिलाषा गावतुरे, अँड.वैशाली टोंगे, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. टी. डी. कोसे, हिराचंद बोरकुटे, डॉ.बळवंत भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी पर्यावरण संवर्धन व विकास समिती बल्लारपुरचे अध्यक्ष सुधीर कोरडे,उपाध्यक्ष केशव थिपे, सचिव राजेश बट्टे, अतुल बांदुरकर, सचिन बरडे,राजेश चनकापुरे, अमोल घोटेकर,प्रशांत पिपरे, रणजित धोटे,उत्तम तेलंग,मोरेश्वर सत्रे,शरद ठाकरे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!