गोंडपिंपरी- जिल्हा वार्षिक योजना 2023-2024 अंतर्गत जि प शाळा, मक्ता, ग्राम पंचायत भंगाराम तळोधी येथील नविन ईमारतीचा भूमिपूजन सोहळा दि. 16-06-2024 रोजी गावकऱ्यांचा उपस्थितीत उत्साहाने पार पडला.
ग्राम पंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत असलेल्या मक्ता गावातील गावकरी जि प शाळेच ईमारत बांधकामाचा प्रतिक्षेत होते. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी ईमारतीस मंजूरी देऊन गावकऱ्यांची प्रतिक्षेस पूर्णविराम दिला. यामूळे शाळा सूरू होणार असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार व पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
भूमिपूजन अमरभाऊ बोडलावार यांचा हस्ते पार पडले. यावेळी ग्राम पंचायत भंगाराम तळोधी सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, उपसरपंच सूनिलभाऊ घाबर्डे, ग्रा पं सदस्य चांदेकर,अनिता पोटे,शा व्य समितीचे अध्यक्ष काशीनाथ पोटे, शा व्य समितीचे सदस्य रवी तारोडे,,सर्व सदस्य, तसेच शिक्षिका बोंडे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद , पालकवर्ग व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.