गोंडपिपरी, दि. १६- मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गोंडपिपरी तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १६) शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबीराचा गोंडपिपरी तालुका परीसरातील १४२७ नागरीकांनी लाभ घेतला.
सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबीरात मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग आणि त्वचारोग यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या १४२७ रुग्णांपैकी ५१५ रूग्ण हे शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर उद्यापासून टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या शिबिरामध्ये बोलताना, आयोजक तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, गोरगरीबांच्या हाकेला ओ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी अतीगंभीर आजार अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी गोंडपिपरी तालुक्यातील गोरगरिब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशाप्रकारच्या महाआरोग्य शिबीराचे आज आयोजन करण्याचे आले. या शिबिराचा गोंडपिपरी परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले याचे मला आत्मीय समाधान वाटते.
पुढे बोलताना, पुढच्या टप्प्यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर, जिवती व राजुरा याठिकाणी सुद्धा अशाप्रकारच्या भव्य महाआरोग्य शिबीरांचे लवकरच आयोजन होणार असून नागरिकांनी त्या ठिकाणीही अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.
या शिबिरात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, माजी पं. स. सभापती दिपक सातपुते, नगरसेवक राकेश पुण, माजी जि. प. सदस्य अमर बोडलवार, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, संजय उपगण्लावार, सुरेश धोटे, अनंता येरणे, इंद्रपाल धुडसे, संजय झाडे, निलेश पुलगमकर, साईनाथ मास्टे, गणपती चौधरी, बंडू बोनगीरवार, अरुण कोडापे, मनिष वासमवार, प्रकाश रापलवार, रमेश दिंगलवार, सतिश वासमवार, मनोज वनकर, बंडू गौरकार, गणेश मेरुगवार, शिथील लोणारे, राहुल चौधरी, गणेश डहाळे, स्वप्नील अनमूलवार, सुरेखा श्रीकोंडावार, अरुणा जांभूळकर, कोमल फरकाडे, मायाबाई वाघाडे, नगरसेविका मनिषा मडावी, मनीषा दुर्योधन, अश्विनी कोडापे, शारदा गरपल्लीवार, संदिप पौरकर, पंकज चिलनकर, वैभव बोनगिरवार, प्रज्वल बोबाटे, अण्णा उलेंदला, सत्यवान भोयर, बळवंत पिपरे, मनोज खेकारे, बळवंत चिलनकर, अंकुश उईके, नितीन तुंमडे, कार्तिक पेंदोर, अमित भोयर, साहिल बट्टे, कार्तिक बट्टे, जय खरबनकर, अंकुश भोयर, रितीक चिलनकर, संतोष मुगलवार, अमीर खान पठाण यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.