Homeचंद्रपूरभद्रावतीसुषमा शिंदे यांच्या वाढदिवशी दोन पाल्यांना घेतले शैक्षणिक दत्तक

सुषमा शिंदे यांच्या वाढदिवशी दोन पाल्यांना घेतले शैक्षणिक दत्तक

भद्रावती तालुक्यातील मुरसा येथील पितृछत्र हरविलेल्या कुटुंबातील समिक्षा विनोद बोरकुटे व धनश्री विनोद बोरकुटे या दोन मुलींना आज स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे ट्रस्ट चंद्रपूर च्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त  स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजनेअंतर्गत शैक्षणिक दत्तक घेण्यात आले. यांचे पुढील शिक्षणाची जबाबदारी ट्रस्टनी स्विकारली.

मुरसा येथील लक्ष्मी विनोद बोरकुटे यांना कुटुंबातील पाल्यांना ट्रस्टव्दारे शैक्षणिक दत्तक घेतल्याचे रितसर पत्र देण्यात आले. याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र पढाल, सुनिल मोरे, अरुण घुगुल आदी उपस्थित होते.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे ट्रस्ट चंद्रपूर हि समाजातील घटक वर्गाकरीता ट्रस्टच्या वेगवेगळया उपक्रम अभियान अंतर्गत सामाजिक कार्य करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!