चंद्रपूर: धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या सामाजिक दायित्व विभागाअंतर्गत पहेल मल्टिपर्पज सोसायटी ही संस्था मागील 7 वर्षा पासून सामाजीक कार्य करत आहे.ज्यामध्ये किशोरी मुली, महिला, शेतकरी, व 6 ते 14 वयोगटातील मुलांना करिता निःशुल्क वर्ग इ.घटकावर कार्य सुरु आहेत .या संस्थेचे कार्यक्षेत्र एकूण 10 गावामध्ये ज्यात मोरवा, चारगाव, ताडाळी,येरुर, सोनेगाव, शेणगाव,पांढरकवडा, वढा, धानोरा,अंतूर्ला या गावाचा समावेश आहे.
शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अंतूर्ला येथे शिकवणी वर्गाचा उद्घाटनिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित गावाच्या उपसरपंच माननीय सौ. अनिता सुरेश जोगी, ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ. जानवी नथू देवतळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सौ. सुनीता पंढरी फुलझेले, गावाच्या आशावर्कर श्रीमती. सुमन भाऊराव चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य माननीय सौ .अनिता मधुकर कौरासे व विदयार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले व मुलांनी जिवनात पुढे जावे , यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालसखी कु. सेजल भाऊराव चांदेकर यांनी केले.