गडचांदूर-प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदुर द्वारे दिनांक 9 जुलै ते 15 जुलै दरम्यान स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन 09 जुलैला ऍड.पूनम अर्जुनापुरे (राष्ट्रीय महामार्ग)यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक गडचांदूर मा. शिवाजी कदम साहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर 10 जुलैला गणित मित्र प्रा. योगेश वानखेडे यांचे गणित विषयावर व्याख्यान होणार आहे. 11 जुलैला डॉ. पांडुरंग सावंत यांचे “नैतिक मूल्ये व संताचे योगदान”, 12 जुलैला मा. रामचंद्र राठोड यांचे “स्पर्धा परीक्षा-आव्हाने व मार्ग”, 13 जुलैला पोलीस निरीक्षक मा. शिवाजी राठोड साहेब (ACB गडचिरोली) यांचे “अधिकारी बनने खरेच सोप” याविषयावर मार्गदर्शन होणार असून, 15 जुलैला समारोपीय कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रशांत सरकार यांचे “स्पर्धा परीक्षा आणि युवक”याविषयावर मार्गदर्शन होणार असून, स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा लाभ परिसरातील सर्व महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा.असे आवाहन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजक प्राचार्य नानेश्वर धोटे,मा. रमेश राठोड सर, मा. अरविंद मुसने सर यांनी केले.