Homeचंद्रपूरआनंद निकेतन महाविद्यालय आपल्या गावी - १२ ग्रामपंचायतींमध्ये ७७३ नागरिकाना दिले योगाभ्यसाचे...

आनंद निकेतन महाविद्यालय आपल्या गावी – १२ ग्रामपंचायतींमध्ये ७७३ नागरिकाना दिले योगाभ्यसाचे धडे….

वरोरा: महारोगी सेवा समिती, वरोरा संचलित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा च्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय आपल्या गावी उपक्रमांतर्गत “योग स्वतःसाठी व समाजाकरिता” हा उद्देश पुढे ठेऊन २१ जून २०२४ ते ३ जुलै २०२४ दरम्यान वरोरा तालुक्यातील १२ गावांमध्ये एकूण ७७१ लहान मुलांपासून ते वयोवृध्द नागरिकाना योगाभ्यासाचे धडे योग शिक्षक श्री दीपक शिव यांनी दिले.

माणसाच्या जीवनशैलीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे योग. सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग अशी योगाची व्याख्या केली जाते. योगाचे हे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावे जेणेकरून सर्वांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात परसोडा, सूर्ला ,बोडखा, सालोरी येन्सा ब्लॉक मजरा खुर्द, खांबाडा , टेमुर्डा, बोपापुर, एकार्जूना
, बोर्डा , सालोरी, कोसरसार इत्यादी गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक ३ जुलै २०२४ ला उपक्रमाचा समारोप ग्रामपंचायत आनंदवन येथे करण्यात आला. सर्वच गांवामध्ये योग वर्गाचे आयोजन प्राचार्य डॉ मृणाल काळे, उपप्राचार्य सौ. राधा सवाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. तानाजी बायस्कर, प्रा. मोक्षदा नाईक, प्रा.सुरेश राठोड, श्री तुषार पारखी यांनी सर्वच गावातील महाविद्यालयात शिक्षण घेणारे आजी – माजी विद्यार्थी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांच्या मदतीने केले.
परसोडा व सुरला ग्रामपंचायत येथे सोमवार, दिनांक २४ जून २०२४ ला हनुमान मंदिर व जिल्हा परिषद शाळेत योग वर्गाचे आयोजन श्री शुभम आमने, रमेश पावडे उपसरपंच ग्रा. पं. परसोडा
सुर्ला ,रवी देसाई – सदस्य, मोहन परचाके, आकाश धगडी – पोलीस पाटील सुर्ला यांनी केले. बुधवार दिनांक २६ जून ला बोडखा व सालोरी येन्सा ब्लॉक मजरा ग्रामपंचायत येथे श्री गुरदेव सेवा मंडळ व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात बोडखा ग्रामपंचायत चे सरपंच नामदेव थाटे , सदस्य रुपेश तूराळे , गुरुदेव सेवा मंडलाचे परमात्मा पंधरे , समीर तूराळे , अमित कामडी, अंकित थाटे तसेच मजरा ग्रामपंचायत चे प्रमोद तोडासे उपसरपंचमजरा,
सारिका धाबेकर सदस्या/ तंटामुक्त समिती अध्यक्ष
निखिल बोढे व किसन वर्मा
सुधीर महातळे युवा समिती सदस्य , दिक्षा धाबेकर, निशा बोढे, निशा सोनटक्के – GMRVF VOLUNTEER यांनी केले. गुरुवार दिनांक २७ जून ला खांबडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ग्रामपंचायत खंबाळा चे सरपंच श्री प्रकाश रावजी शेळके, श्री प्रफुल थूटे, उपसरपंच नालिनीताई थुटे, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल ढाले गावातील प्रतिष्ठित नागरिक गजाननराव धाटे, वैशाली कडुकर, प्रार्थना वाडई यांनी केले. शुक्रवार २८ जून ला टेमूर्डा व बोपापुर ग्रामपंचायत येथे कुणाल दातारकर, अक्षिता तिखट, अंकित तिखट , ग्रामसेवक बोरचाटे, सरपंच सुचिता ठाकरे
, उपसरपंच सौ. वाटोळे
सदस्य संगीता तिखट
, फकिरचंद कोटांगले, मयूर विरुटकर तसेच गट ग्रामपंचायत खापरी अंतगऀत येणाऱ् ताडाळा बोपापुर येथे ग्रामपंचायत खापरी चे सरपंच सौ पुष्पा रमेश हिरादेवे, सदस्य श्री मोरेश्वर बालाजी कुतरमारे, पोलीस पाटील श्री प्रतीक अरूण हिरादेवे, आशा वकऀर् लिलाताई केशव वासेकर, माजी भारतीय सैनिक रूपेश बालाजी कुतरमारे , आयुष आयुर्वेदिक दवाखाना चिकनी योगा प्रशिक्षक सौ शितल शैलेश मिटकर, वरीष्ठ व्यक्ती विठ्ठल गणपत हिरादेवे तसेच आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन माजी विद्यार्थी तथा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक श्री रूपेश पांडुरंग कुतरमारे आणि रा से यो स्वयंसेविका कु वैष्णवी प्रमोद कुतरमारे आदि सर्व उपस्थित होते. शनिवार दिनांक २९ जून ला एकर्जुना ग्रामपंचायत येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात योग वर्गाचे आयोजन राष्ट्रीय खेळाडू मयुर भोयर, कुमुद ढाकुलकर, श्री गुरुदेव सेवा मंडळ एकार्जूना चे सर्व सदस्य, सौ. उज्वला थेरे सरपंच, विलास जेनेकर उप सरपंच यांनी केले. रविवार दिनांक ३० जून ला बोर्डा व सोलोरी ग्रामपंचायतीत बोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेत योग वर्ग आयोजना प्रसंगी राहूल ठेंगणे सरपंच बोर्डा ,भूषण बूरीले उपसरपंच ,सुभाषजी ताजने ग्राम विस्तार अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता लांडे , ग्रामपंचायत सदस्य सौ प्रिया भोयर , गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती. तसेच सलोरी येथे सरपंच प्रतिभा शेरकुरे
, उपसरपंच गजानन देहारी
, सदस्य राहुल शेरकुरे ,गुरुदेव व्यायाम प्रसारक क्रीडा मंडळ सालोरी सदस्य पंकज जीवतोडे , अनिकेत जीवतोडे
, अतुल नन्नवरे , तुषार आसेकर, सूरज शेंडे आदी उपस्थित होते. सोमवार दिनांक ०१ जुलै ला ग्रामपंचायत कोसरसार येथे कर्मवीर विद्यालय व जिल्हा परिषद शाळा कोसरसार येथे शाळेचे विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.ढोबळे सर,सौ माहूरे ,सौ मोडघरे उपस्थित होत्या…तथा कर्मविर विद्यालय कोसरसार शाळेचे संपूर्ण विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.डांगाले , सागोळले सर,नगराळे ,तलमवार मॅडम,श्री साळवे,श्री लडके , श्री वाकडे‌ सर, श्री आत्राम उपस्थित होते….
तसेच गावातील सरपंच श्री.गणेश मडावी,उपसरपंच श्री.अमित बहादूरे, ग्रा.प सदस्या सौ कारवटकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.नितीन मायकरकार, गणेश उराडे,मयुर बुरांडे,संदिप निबरड,अनुप वरभे, सुयोग भटकर, वैभव कारवटर,करण निमरड उपस्थित होते. ३ जुलै ला ग्रामपंचायत आनंदवन येथे या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. समारोप समारंभाला ग्रामसेवक सौ खरवडे, सरपंच सौ दरेकर, उपसरपंच श्री शौकत खान, तसेच एनसीसी ऑफिसर, एनसीसी कॅडेट व नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!