गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी प्रशांत शाहा:
गडचिरोली – जिल्यातील जारावंडी परिसरातील जवळपास 50 गावे यांना मागील आठवड़ा भरापासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी टंचाई, सोबतच रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य आहे.
जारावंडी परिसरातील लाईन पेंढरी येथील उपकेेंद्रांतर्गत जोडलेली आहे आणि पेंढरीतील लाईन गडचिरोली वरून जोडली आहे गडचिरोली ते पेंढरी चे अंतर जवळपास 60 ते 70 किमी चा आहे अशात संपूर्ण परिसर हा जंगलव्याप्त असल्याने मोठ्या प्रमाणात लाईन चे उपडाऊन नेहमीच सुरू असते
जारावंडी परिसरातील 50 गावांचा यात समावेश आहे. आणि सलग सहा दिवापासून वीज खंडित झाला आहे आणि तो अद्यापही पूर्वरत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जारावंडी परिसरातील 50 गावात वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक ऑनलाईन कामे ठप्प झाले आहे. प्यायला पाणी मिळत नसल्याने विहीर व कालव्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच वीज नसल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे. बँक, दवाखाने, शाळा, कॉलेज, पीठ गिरणी यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व समस्यांबद्दल परिसरातील नागरिकांचा रोष भडक पाहायला मिळालेला आहे
*50 गावे,दोन लाईनमॅन*
जारावंडी परिसर अति जंगलव्याप्त असून परिसरात लहान मोठे खेडे गाव आहेत आणि त्या प्रत्येक गावात वीजेचा पुरवठा केला गेला आहे आणि या गावांना जंगलातून वीज पुरवठा दिला आहे त्यामुळे अनेक वेळा अल्पशा वादळ वाऱ्यामुळे वीज खंडित होत असते,अशात सदर परिसरात जवळपास 50 गावे येतात परंतु या परिसरात फक्त दोनच लाईनमॅन असल्याने आणि कामांचा व्याप जास्त असल्याने वीज सुरळीत करण्यास लाईनमॅन ला नाकी नऊ येऊ लागले आहे त्यामुळे संबंधित विभागानी रिक्त पदांची भरणा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
*लोकप्रतिनिधी उदासीन*
जारावंडी परिसरात जवळपास 7 ग्रामपंचायती आहेत आणि या ग्राम पंचायतती अंतर्गत अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे अशात वीज समस्या तर नित्याचीच बाब झाली आहे परिसरातील लोकप्रतिनिधी अश्या ज्वलंत समस्यांचा निराकरण करणे अपेक्षित असते परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे परिसरातील लोकप्रतिनिधी समस्यांचा समाधान करण्यास असफल झाल्याचे दिसून येत आहे