HomeBreaking Newsरक्षाबंधन कार्यक्रमाद्वारे शिव्यामुक्त समाज अभियान

रक्षाबंधन कार्यक्रमाद्वारे शिव्यामुक्त समाज अभियान

‘ करू शिव्यांचा नाश , होईल सुसंवादाचा प्रकाश’नारी का सन्मान , देश का यही अभिमान’ अश्या विविध घोषणांनी पडोली चौक दुमदुमत होता. रक्षाबंधन व शिव्या मुक्त समाज जनजागृकता या उपक्रमाअंतर्गत एस आर एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर , विवेकानंद ज्ञानप्रसारक मंडळ चंद्रपूर आणि मास्वे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यायच्या ‘ राणी हिराई विद्यार्थी विकास मंच ‘ च्या वतीने पडोली चौकात ‘ शिव्या मुक्त समाज अभियान जागरूकता पर ‘ रक्षाबंधन व शपथ ‘ कार्यक्रम घेण्यात आला. 9 आगस्ट ते 23 ऑगस्ट कालावधीत महाराष्ट्र असोसिशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स या संघटनेद्वारे महाराष्ट्रातील संपूर्ण समाजकार्य महाविद्यालयात इतरांचा आदर , ‘महिलांचा सन्मान’ ‘ या थीमवर आधारीत समाजकार्र्य पंधरवडा राबविण्यात येत आहे . या पंधरवड्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत याच कालावधीत महिला वर्गाला अपमानित करणाऱ्या अपशब्द तसेच शिव्याच्या विरोधात मास्वे चे अध्यक्ष डॉ अंबादास मोहिते यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘ शिव्या मुक्त समाज अभियान ‘ राबविण्यात येत आहे . रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत पुरुषवर्गाला राखी बांधून या पुढे मी ‘आया बहिणीवरून शिव्या देणार नाही’ याची ओवाळणी द्या असे वचन घेण्यात आले आणि शपथ देण्यात आली. यावेळी विवेकानंद ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंश कुबेर , सचिब श्री विनोदभाऊ खडसे , महिला पोलीस हवालदार श्रीमती मनीषा जगताप, सरपंच पडोली श्री विकी लाडसे, उपसरपंच ताडाळी निखिलेश चामरे , श्रीमती रजनीताई ढुमणे , श्री नदीमभाई प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ जयश्री कापसे , पंधरवड्याचे समनव्यक प्रा नितीन रामटेके ,मंचाच्या समनव्यक डॉ ममता ठाकूरवार उपस्थित होते . राणी हिराई आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून, सर्वानी मनोगत व्यक्त केले. शिव्यामुक्त समाजाची निर्मिती करू अशी शपथ यावेळी घेण्यात आली. नागरिकांना राखी बांधून ओवाळणी मागण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉ जयश्री कापसे आणि श्रीमती मनीषा जगताप यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्याथी , वाहतूक नियंत्रण पथक , मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचालन डॉ कल्पना कवाडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा विश्वनाथ राठोड यांनी केले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!