काँग्रेस विरोधी लोकांकडून पक्षाला बदनाम करण्याचा डाव

0
227

*काँग्रेस विरोधी लोकांकडून पक्षाला बदनाम करण्याचा डाव*

*करंजी गावातील तंटा मुक्त समितीच्या निवडीत काँग्रेस पक्षाचा काहीच संबंध नाही -* _सारनाथ बक्षी_

*गोंडपिपरी* : दिनांक २० रोज मंगळवराला करंजी गावातील तंटा मुक्त समितीची निवड झाली.यात शेतकरी संघटनेत नव्यानेच दाखल झालेले दिलीप वासेकर यांचा विजय झाला. या निवडणुकीत शेतकरी संघटना व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाने सरशी केली नाही.त्यामुळे चुरशीची लढाई होण्याचा प्रश्नच नव्हता.तरी देखील प्रसार माध्यमातून करंजीत काँग्रेसचा धुव्वा,तालुका उपाध्यक्षाचा दारुण पराभव या मथळ्याखाली बातम्या झळकल्या.याचे खंडन करत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सारनाथ बक्षी यांनी दैनिक महासागरला माहिती दिली की,तंटा मुक्त समितीच्या निवडीत पराभूत झालेले वैभव नीमगडे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत सदस्य नाही.ते एक सामाजिक कार्यकर्ते असुन काँग्रेस पक्षाच्या विचारावर चालतात.तसे असुन हि निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नाही.मग पराभूत व्यक्ती काँग्रेस पक्षाचाच कशावरून?काँग्रेस पक्ष हा तळागळातील पक्ष आहे.याला मानणारा मोठा जनसमुदाय आहे.विरोधकही तेव्हढेच असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने पक्षाला बदनाम करण्याचा डाव आखून प्रयत्न करत असतात.सांगायचे म्हणजे विजयी झालेले आत्ताचे शेतकरी संघटनेचे दिलीप वासेकर हे यापूर्वी बहुजन समाज पार्टीत सक्रिय होते तेथून काँग्रेस मध्ये आले त्यानंतर भाजपात गेले.अशा अनेक पक्षातून चढ उतार करत आत्ता ते शेतकरी संघटनेचे झाले. यांनतर ते कुठे जातील याचा नेम नाही परंतु ज्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा काहीच सहभाग नाही आणि या दूरवर संबंध नसतांना पक्षाला बदनाम करण्याचा काँग्रेस विरोधी लोकांचा हा कुटील डाव आहे. असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सारनाथ बक्षी यांनी सांगितले.

लोक बघत आहेत.भाजपसहित अन्य पक्षाने नेहमीच पक्षावर सिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला.परंतु असे करून ते जनतेची दिशाभूल करू शकत नाही. अशा वळणाचा डावपेच जास्त काळ टिकणार नाही,ज्यावेळी काँग्रेसला चिरडण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तो उठेल आणि प्रत्युत्तर देईल. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर या पक्षाने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले हे सर्वश्रुत आहेच.

 *तुकाराम झाडे,तालुका अध्यक्ष* 

 *देवीदास सातपुते,सरपंच पोळसा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here