जिवती (ता.प्र.) : डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक बँकाचे व्यवहार हे इंटरनेट प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहार व देवाण घेवाण गतिमान होतांना दिसते आहे,मात्र,तालुक्यातील डिजिटल इंडिया विदर्भ कोकण ग्रामीण बँक जिवती येथील यंत्रणेमध्ये सतत बिघाड झाल्याने, त्याचा सामान्य जनतेस व ग्राहक यास नाहक त्रास भोगावा लागतो आहे.या शाखेतील एक ते दोन महिन्यापासून लिंक फेल होत असल्याने,
ग्राहकांच्या गरजा पूर्ण कशा होतील असा प्रश्न पडतो आहे.
परंतु बँकिंग व्यवहार गतिशिल होऊन पेपरलेस व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने शासन धोरणाप्रमाणे आणि रिझर्व बँकेच्या दिशा निर्देशाप्रमाणे बँकेचे व्यवहार डिजिटल करण्यात आले.यामुळे शहरी,नोकरदार तसेच मोठ्या व्यापाऱ्याचे व्यवहार गतीने व्हायला लागलेत.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही संपूर्ण शेतीवर निर्धारित असून ते पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्याला पैशाची नितांत आवश्यकता असल्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांची आणि हली प्रशासनाने लाडकी बहिण योजना, लागू केली आहे.त्यामुळे बँकांमध्ये अफाट गर्दी वाढली आहे.
परंतु काही दिवसांपासून विदर्भ कोकण ग्रामीण बँक जिवतीच्या शाखेची लिंक फेल राहत असल्या कारणाने ,पाहिजेत तशी सेवा ग्राहकांना देऊ शकत नाहीत,या विविध समस्यांना नागरीक,शेतकरी व ग्राहक यांना सामोरं जावं लागतं आहे.तरी वरील सर्व बाबींचा व समस्यांचा बँकेने लक्षात घेऊन एक आठवड्याच्या आत लिंक फेल व इतर समस्यांचा निराकरण करावे.अन्यथा संमस्याच निराकरण नाही झालं,तर यत्या तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक लोकांस्मवेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जीवतीच्या वतीने बँकेच्या आवारात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,अशा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष विजय गोतावळे यांनी दिला आहे.