Homeचंद्रपूर३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन चंद्रपुरात*

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन चंद्रपुरात*

 

चंद्रपूर, ता. २४ : लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, सा. शैक्षणिक संस्था चंद्रपूर व जयभीम संमेलन समिती चंद्रपूरच्या वतीने ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दुसरे

राष्ट्रीय जयभीम संमेलन चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारिक, लोककलावंत, जलसाकार, नाटककार, वक्ते, मंत्री, खासदार, आमदार, चळवळीतील कार्यकर्ते, नेते, कवी तसेच आयएएस अधिकारी उपस्थित राहणार असून वेगवेगळ्या विषयांचे स्कालर्स एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने बौद्धिक मेजवानीचा अनोखा मेळा चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे.

 

संमलनाचे उद्घाटन शनिवार, ३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे राहणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते उद्घाटक होणार आहे, तर विशेष मार्गदर्शक म्हणून दिल्ली सरकार मधील माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजेंद्रपाल गौतम उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे, गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सुभाष धोटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी समितीच्यावतीने त्यांचा सत्कार होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत व उद्योजक गुणवंत देवपारे, माजी आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. ईसादास भडके उपस्थित राहणार आहेत. जयभीम संमेलनाला जास्तीत जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.

 

 

*विविध कार्यक्रमाची मेजवानी*

*दिनांक : शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४*

> उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ वाजता जयभीम कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी खेमराज भोयर, नरेंद्र सोनारकर, जसबिर चॉवला, मिर्जा पठारे, सीमा भसारकर, प्रब्रम्हानंद मडावी यांचा सहभाग असणार आहे.

> > रात्री ८:४५ वाजता जयभीम आंबेडकरवादी जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी ( कुंकू लावीलं रमानं फेम ) , गायक रविराज भद्रे, धम्मजीत तिगोटे जलसा सादर करणार आहेत.

*दिनांक : रविवार, १ सप्टेंबर २०२४*

> सायंकाळी ६ वाजता जयभीम विद्रोही गिते : राहुल सूर्यवंशी, निशा धोंगळे, अश्विनी खोब्रागडे, उपेंद्र वनकर, विजय पारखी, डॉ. रविराज विद्रोही, मास्टर सोमकुवर सादर करणार आहेत.

> सायंकाळी ६.३० वाजता जयभीम परिसवांद : भारतीय लोकशाही जपण्यासाठी निवडणूक आयोग, मीडिया व मतदारांची भुमिका या महत्त्वाच्या विषयावर ऍड. अन्नासाहेब पाटील, पी. व्ही. मेश्राम, डॉ. ईसादास भडके, डॉ. अनमोल शेंडे, प्रा. दिलीप चौधरी, रमेशचंद्र दहीवडे, खुशाल तेलंग, इंजी. सतीश पेंदाम, कोमल खोब्रागडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, नम्रता ठेमस्कर, प्रशिकानंद मार्गदर्शन करणार आहेत.

> रात्री ७.१५ वाजता ” व्हय मी सावित्री बोलतेय” एकपात्री नाटk

> रात्री ७.३० वाजता जयभीम रत्न पुरस्कार व समारोपीय समारंभ. कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी ऊर्जामंत्री, आमदार नितीन राऊत, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, जेष्ठ आंबेडकरी नेत बापूसाहेब गजभारे, डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत उपस्थित राहणार आहेत.

> रात्री ९.१५ वाजता जयभीम बुद्ध भीम गीतांचा महाजलसा : सादरकर्ते गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कडूबाई खरात (तुम्ही खाता त्या भाकरीवर…) आणि मंजुश्री शिंदे ( लई बळ आलं फेम)

————————————————

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!