Homeचंद्रपूरजिवती"क्षयरोग मुक्त भारत करण्याकरिता सहभागी व्हा;

“क्षयरोग मुक्त भारत करण्याकरिता सहभागी व्हा;

जिवती (ता.प्र.) : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रतिबंध करण्यासाठी एडल्ट बीसीजी लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र मधील चंद्रपूर जिल्हा ची निवड झाली आहे त्या अनुषंगाने जिवती व कोरपणा तालुका मध्ये मागील मार्च एप्रिल 2024 या दरम्यान सर्वे मध्ये पात्र लाभार्थी 8201आढळूनआले होते. सर्वेदरम्यान लाभार्थी म्हणून पूर्वी टीबी उपचार घेतलेले म्हणजेच पाच वर्षांपूर्वीचे रुग्ण रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती ,साठ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक मधुमेह असलेले तसेच धूम्रपान करणारे व्यक्ती व ज्या व्यक्तीचे बाडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी आहेत यांची गाव पातळीवर आशा वर्कर यांच्या माध्यमातून सर्वे करून घेण्यात आला होता व त्यांना नागरिकाची संमती घेऊन इच्छुक ठरविले होते त्यानुसार आता माहे 3सप्टेंबर या तारखेपासून लसीकरण सत्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळत एकूण 90 इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेतला व त्याची टीबी विन पोर्टलवर नोंद घेण्यात आली तरी एडल्ट बीसीजी लसीकरण सत्र एक महिना साधारण चालेल तरी बीसीजी लस ही लहान मुला प्रमाने च आहे त्याचे काही दुष परिणाम नसल्या मुळे पात्र लाभार्थी जे आहेत त्यांनी समती दर्ष उन लसीकरण करून घ्यावे त्या मुळे क्षय रोग होण्याचा धोका कमी होईल .

क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरिया टू बोरक्लोसिस जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. फुफ्फुसाच्या क्षयरोगाने आजारी व्यक्ती जेव्हा खोकताना किंवा शिकताना हवेद्वारे क्षय रुग्णाचे जिवाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो निदान झाल्यास व नियमित उपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. क्षय रोगाची लक्षणे दिसता त्वरित डॉक्टरांना भेटावे. लक्षणे दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला दोन आठवडे पेक्षा जास्त कालावधीचा ताप वजनात लक्षणीय घट थुंकी वाटे रक्त येणे मानेवरील गाठ यानुसार आहेत. क्षयरोग उपचार कालावधी सहा महिने व जास्तीत जास्त वीस महिने यानुसार आहे तसेच प्रत्यक्ष रुग्णाला उपचार होईपर्यंत प्रतिमा रूपे पाचशे रुपये अनुदान पोषणा करिता रुग्णांच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यानुसार जिवती व कोरपणा हे हे तालुके ट्रायबल असल्यामुळे टीबी रुग्णांना एकदा 750 अनुदान दिल्या जाते.
त्याकरिता माननीय श्री डॉक्टर स्वप्निल टेंभे तालुका आरोग्य अधिकारी जिवती कोरपणा यांनी एडल्ट बीसीजी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केलेले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!