HomeBreaking Newsशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जिवती येथे संविधान मंचाचे लोकार्पण

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जिवती येथे संविधान मंचाचे लोकार्पण

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्याने मा. मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिवती येथे संविधान मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
श्री. जगदीप धनखड, उपराष्ट्रपती, भारत सरकार , यांच्या शुभ हस्ते दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याना संविधान संबंधित शिकवण प्रभावीपणे देण्यासाठी संविधान विषयक उपक्रम यामध्ये,निबंध ,भाषण,विवाद,प्रश्नमंजुषा ,चित्रकला, रंगोली आलेख इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्राचार्य मा. श्री गुनानंद वासनिक, गटनिदेशक श्री. जितेंद्र घ्यार , मुख्य लिपिक श्री. गोतमारे , कनिष्ठ लिपिक श्री. नरेंद्र मलिक , संस्थेतील खालील शिल्पनिदेशक श्री. विनय खांडेकर , विवेक शेंडे , भोयर, रवि जेवाले, आकाश देवरवाड , राम चव्हाण, तसेच शिल्पनिदेशिका कू. दीपा मेश्राम , कु. सारिका वासेकर , कु. सोनाली राठोड,आणि संस्थेतील इतर कर्मचारी शाहीर भुजंग बसवंते, पट्टेवाले यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेच वाचन करून मार्गदर्शनासह कार्यक्रम संपन्न झाला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!