Homeचंद्रपूरराजुरागोंडवाना विद्यापीठाचा यशश्री वार्षिक अंकाला प्रथम पुरस्कार

गोंडवाना विद्यापीठाचा यशश्री वार्षिक अंकाला प्रथम पुरस्कार

राजुरा: आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या”यशश्री”वार्षिक अंकाला गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. “आदिवासी समाज: साहित्य व संस्कृती”या विषयावर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू मा. डॉ. प्रशांत बोकारे, प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन यांच्या हस्ते 2 ऑक्टोंबर विद्यापीठाच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मागील सत्रात सुद्धा आमच्या वार्षिक अंकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा अध्यक्ष स्मृतीशेष लोकनेते आदरणीय प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या प्रेरणेतून यशश्री वार्षिक अंक सुरु करण्यात आला होता त्यांचेच फलित म्हणून विद्यापीठाचे अनेक पुरस्कार वार्षिक अंकाला प्राप्त होत आहे.

प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उप प्राचार्य डॉ. खेरानी सर यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असते. डॉ. संतोष देठे, संपादक, डॉ. संजय शेंडे सहसंपादक, डॉ. संजय लाटे लवर, डॉ. चेतना भोंगाडे, डॉ. वनिता वंजारी, डॉ. सारिका साबळे तसेच विद्यार्थी संपादक मंडळ प्रमुख कुमारी राधा लीलाधर दोरखंडे यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव कुंदजवार साहेब, उपाध्यक्ष श्री गोडे साहेब, श्री दत्तात्रेय जी वेगीनवार साहेब हिशोब तपासणी, सचिव श्री अविनाशजी जाधव, सहसचिव डी.बी. भोंगळे, कोषाध्यक्ष संजय भाऊ धोटे माजी आमदार, संचालक श्री साजिद बियाबानी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी संपादक मंडळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!