Homeचंद्रपूरघोट येथील सिद्धी उपाध्ये जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित..

घोट येथील सिद्धी उपाध्ये जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित..

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थिनी सिध्दी हेमंत उपाध्ये हिला गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ व १३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाने सन्मानित केले. जो तिच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील दोन वर्षांच्या उत्कृष्ट सेवेचा परिणाम आहे.

सिद्धी हिला वर्ष २०२३-२४ चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट NSS स्वयंसेवक पुरस्कार मिळाला आहे. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे, रजिस्ट्रार डॉ अनिल हिरेखन सर, व NSS संचालक श्याम खंडारे यांनी सिध्दीला सन्मानित केले.

सिद्धी हिने यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे सर, प्राचार्य बनपूरकर सर व एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.पवन नाईक आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!