राजुरा: तालुक्यातील उपक्रेंद्र सास्ती येथे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी (ता.९) सकाळी आठ वाजताच्या सुमारास राबविण्यात आली. या शिबिरात रुग्णाचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये बीपी, शुगर, एचबी तपासणी करण्यात आली. जे रुग्ण आजारी होते त्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले.संशयित आजारी असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष घरी भेट देण्यात आल्या.त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांना भेट देऊन गावातील नागरिकांच्या उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली. यात प्राथमिक आरोग्य केंद्र कढोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओम सोनकुसरे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले.या शिबिराला डॉ. बुर्लावार, डॉ. दुधे, सामुदायिक आरोग्य अधिकारी दीपिका वर्मा,आरोग्य सहाय्यक श्री. कौरासे, एलएचवी भगत,एलटी बोरावार, एएनएम श्रीमती गोगुलवार , एसएफडबल्यू श्री. धानोरकर,श्री निकुरे, एफडबल्यू श्री. नागरगोजे,सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.यामध्ये गावातील पदाधिकारी व गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.