प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)
भामरागड : दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणुन पाळण्यात येतो. गडचिरोली पोलीस दलामधील कित्येक जवांनाना नक्षल्यांसोबत लढतांना हौताम्य पत्करावा लागले सदर शहीद जवानांच्या स्मृती अजरामर राहावे व मातृभुमीच्या संरक्षणासाठी दिलेले बलीदान कायम प्रेरणादायी राहावे यासाठी शहीद पोलीस जवांनाना श्रद्धांजली वाहण्याकरीता तसेच शहीदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस स्टेशन भामरागड येथे पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला.
पोलीस स्मृती दिन कार्यक्रम प्रसंगी दीपक डोंब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भामरागड, एसआरपीएफ पोलीस उपनिरीक्षक आर.बी.होल, सिआरपीएफ चे रेड्डी, शंभु पाटील पोलीस उपनिरीक्षक क्युआरटी भामरागड, संकेत नानोटी पोलीस उपनिरीक्षक, सुरज इंगळेपोलीस उपनिरीक्षक, धनश्री सगणे पोलीस उपनिरीक्षक, बाबुराव आलाम श्रेणीपोउपनि व जिल्हा पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ, क्युआरटी अंमलदार तसेच विर शहीद किशोर आत्राम यांची मातोश्री शशीकला आत्राम व सचिन आत्राम हे उपस्थित होते. .
पोलीस स्टेशन भामरागड च्या आवारातील शहीद स्मारकासमोर सिआरपीएफचे सलामी प्लाटुनद्वारे शहीदांना शोक सलामी देवुन मौन पाळुन उपस्थित विर शहीद किशोर आत्राम यांचे मातोश्री शशीकला आत्राम यांचे हस्ते पुष्पांजली वाहुन मानवंदना दिली सदर कार्यक्रमप्रसंगी दीपक डोंब पोलीस निरीक्षक यांनी शहिद पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याची प्रचिती सांगुन सर्व शहिदांना अभिवादन केले.