राजुरा – स्मृतिशेष सितारामजी बोरकुटे यांचे स्मृती प्रित्यर्थ दि.30.10.2024 रोज बुधवारला समाजमंदिर साखरवाही येथे त्यांची नात डॉ. स्नेहल नारायण बोरकुटे हिने मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजीत केले.
या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी साखरवाही गावातील सर्व समाजातील वयोवृद्ध स्त्रिया मंचावर प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यामध्ये कलाबाई पुंजाराम बरडे, गंगुबाई लायनू वैरागडे, मीराबाई कवडू मडावी, सुरेखा दत्तु लोहे, झिबलाबाई ईश्वर कोल्हे, मंदाबाई ऋषी करमनकर, सुंदराबाई सितारामजी बोरकुटे, विक्ताबाई परशुराम वणकर, कमलाबाई नामदेव आईलवार, कलाबाई जगन कुळवे आदी मंचावरील महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमांना मालार्पण करुन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रेखाताई अशोकराव घुंगरूड यांनी जिजाऊ वंदना गायन केली. याप्रसंगी मंचावर उपस्थित वयोवृद्ध महिलांना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. व तसेच मंचावरील सर्व स्त्रियांनी समाजसेवी डॉक्टर म्हणून डॉ. स्नेहल बोरकुटे व पती डॉ. स्वप्निल घुंगरूड यांचा पुषपगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. स्नेहल ही विद्धकर्म, अग्नीकर्म व पंचकर्म तज्ञ बनली व पहिले आरोग्य शिबीर आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या साखरवाही या खेडेगावात आयोजीत केले. यावेळी डॉ स्नेहलचे वडील नारायण सिताराम बोरकुटे यांनी गावाचे ऋण फेडण्याची संधी मिळावी म्हणून शिबिराचे आयोजन केले असे सांगितले. तसेच डॉ. स्नेहलचे सासरे अशोकराव घुंगरुड यांनीसुद्धा आपले मनोगतात खेड्यातील आदर्श संस्कृतीचे महत्त्व विषद केले. तसेच डॉ स्नेहलने आपल्या मनोगतात खेड्यातील लोकांनी आपले आरोग्य कसे जपावे हे समजावून सांगितले व एकूण 80 रुग्णांवर मोफत तपासणी करून औषध दिले व आस्थेने विचारपूस केली.
उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन रसिका वडस्कर यांनी केले. या शिबिराचे यशश्र्वीतेकरिता सर्व बोरकुटे परिवाराने अथक परिश्रम घेतले. व सर्व गावकऱ्यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले.