राजुरा विधानसभेतील गोंडपिपरी तालुक्यातील राजकारणाला सध्या वेगळं वळण आलेले आहे. कारण तारसा खुर्द येथील भाजपा आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिनांक 4 नोव्हेंबर ला शेतकरी संघटनेचे उमेदवार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला.
पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया बोलून दाखविल्या त्यात स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न उचलणारा आजघडीला एकमेव नेता म्हणून चटप साहेब आहेत तेव्हा आम्ही आमच्या विदर्भासाठी व आमच्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शेतकरी संघटनेचाच उमेदवार विजयी करणार असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.
याप्रसंगी शालिकजी माऊलीकर जिल्हा समन्वयक, रामकृष्ण सांगडे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना, आनंदरावजी खर्डीवार, तालुका समन्वयक, व्यंकटेश मल्लेलवार तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना सचिन कुळे उपसरपंच सास्ती, अशोकराव भस्की सर, प्रसाद राव शहर अध्यक्ष शेतकरी संघटना गोंडपिपरी, नरेश पोटे उपाध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष, सूरज भस्की, कमलाकर खोब्रागडे,पांडुरंग भोयर, विनोद एकोनकर, जनार्दन डूमने, अविनाश बटे, दुर्योधन झाडे, अतुल डूमने, यांच्या उपस्थितीत आशिष चुदरी, समीर येलेकर, तिरुपती भोयर,सूरज चौदरी व शेकडो कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.