जिवती (ता.प्र.) : लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते येल्लापुर येथील भाजप व वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांना विजयराव बावणे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ.सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यात डॉ.ईश्वर गायकवाड, ग्राम पंचायत येल्लापुर येथील माजी उपसरपंच रामू वाघवसे, वंचितचे विनायक गायकवाड, सिताराम वाघवसे, सोनाली ईश्वर गायकवाड, मीनाक्षी भैय्यासाहेब शिनगारे, शांताबाई सीताराम वाघवसे, प्रेमकला राजेंद्र ससाणे यासह अनेकांचा समावेश होता.
याप्रसंगी डॉ.जांभूळकर, रसूल पटेल, येल्लापुर येथील तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र मानकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष बालाजी कांबळे, दिपक साबने, गणपत सोनकांबळे, सूरज चिकटे, प्रशांत कांबळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजयराव बावणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर डॉ. ईश्वर गायकवाड यांनी देशातील, राज्यातील भाजप सरकार हे बहुजनाच्या हिताच्या विरोधी, संविधान विरोधी षडयंत्र करते याची जाणीव झाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले.