प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)
मूलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील गांधीनगर येथे शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा प्रचार आणि शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यत्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चारशेहून अधिक जणांनी शिवसेनेचे (शिंदे गट) सदस्यत्व घेतले. या काळात शिवसेना पक्षाचे सदस्य होण्यासाठी तरुणांमध्ये मोठी उत्सुकता होती.
कार्यक्रमाला संबोधित करताना मुलचेरा तालुका शिवसेना तालुकाप्रमुख गौरव बाला म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या धोरणांनी प्रभावित होऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे सदस्यत्व मोहिमेला मोठा बळ मिळत आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.दिपकजी विश्वास, श्री.संजीव पोद्दार, श्री.भावेश ढाली, श्री.राजेश मिस्त्री, श्री.राजेश तांती, श्री.निशांत बाला, श्री.निताताई करमकर, श्री.राहुल विश्वास, श्री.मुरारी. देवनाथ, दीपक मंडल, अमित अधिकारी, बिप्लव मिस्त्री, विशाल सोटके आदी कामगार उपस्थित होते.