सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली , चंद्रपूर च्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत येत्या 2024 विधानसभा निवडणूकीप्रती जनजागृती व्हावी म्हणून 20 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आपण सर्वांसाठी देश हित आणि न्यायव्यवस्था टिकविण्यासाठी संविधानीक पद्धतीने निवडणूक कार्य पार पाडूया, हि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. येत्या निवडणूक कार्यक्रमात आपण सर्व सहभागी होऊन. राष्ट्र मजबूत करूया आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ या, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी मतदार जागरूकता उपक्रम राबवला.
दिनांक 17 नोव्हेंबर ला विद्यार्थ्यांनी जटपुरा गेट व मौलाना आझाद गार्डन जवळील संडे मार्केट येथे मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करणारे बॅनर हातात घेऊन लक्ष वेधून जनजागृती केली . मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 65% मतदान झाले याचाचं अर्थ 35% मतदार अजूनही मतदानाच्या अधिकारांबद्दल जागरुक नाही म्हणून अश्या पद्धतीचे उपक्रम करून विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.आपले मत वाया जाऊ देऊ नका. हा संविधानिक अधिकार आहे, असा संदेश देण्यासाठीच्या या उपक्रमात विघ्नेश्वर देशमुख, मोरेश्वर मडावी, सुरभी पार्शिवे, साक्षी कोडापे, आकांशा मसराम ,रोहित देवतळे, नयन आत्राम सहभागी झाले होते