प्रितम म गग्गुरी (उपसंपादक)
अहेरी:- हॅपी थॉट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फॉउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, मॉडेल स्कूल, बायपास रोड अहेरी येथे रविवार दिनांक 01/12/2024 रोजी रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मार्गदर्शक डॉ. कन्ना मडावी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अहेरी व विवेक व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ. समता मडावी यांच्या हस्ते झाले
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. समता मडावी यांनी ध्यान म्हणजे आपल्या कामाप्रती असलेली श्रद्धा होय.वाचन संस्कृती वाढून मोबाईलचा उपयोग त्यासाठी व्हावा याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले
तेजज्ञान फॉउंडेशनचे श्रीनिवास कारेंगुलवार यांनी तेजज्ञान फॉउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीचा कटीबद्धतेचा उल्लेख करत, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मानात शांतता निर्माण करने आवश्यक आहे असे सांगितले. जीवनात एक स्वल्पविराम घेण्याचे महत्व पटवून देत हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. कन्ना मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आपल्या जवळ असलेल्या गोष्टीत आनंद मानायचं असते परंतु मनुष्य दुसऱ्याशी तुलना करून दुःख ओढवून घेतो. तेजज्ञान फॉउंडेशनची शिकवण वर्तमानात जगा या मार्गानी सर्वांनी चालले पाहिजे. जेवढ्या लवकर अध्यात्माचं ज्ञान आपण घेऊ तेवढ्या सकारात्मक दृष्टीने जीवन सहजतेने जगता येईल.
नवीन गोष्ट शिकण्यासाठी , आत्मसात करण्यासाठी नेहमी आपण तत्पर असले पाहिजे.तेजज्ञान फॉउंडेशन च्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ध्यानावर प्रकाश टाकणारी ध्यान कसे करायचे,त्यात येणारे अडथळे यावरील तेजगुरू सरश्रीच्या मार्गदर्शनाची चित्रफित दाखविण्यात आली.या कार्यक्रमासाठी 200 पेक्षा जास्त साधक, नागरिक आणि विध्यार्थी सहभागी झाले होते. तेजज्ञान फॉउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री लिखित ध्यान नियम व आशा आणि विश्वास या प्रसादरूपी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु नागरे यांनी केले.
रजत जयंती ज्ञान महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम मनन आश्रम पुणे येथे रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ ला होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता सोनू सुद आणि शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर उपस्थित राहणार आहेत याचे live telecast, you tube, face book आणि इंस्टाग्राम वर होणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन तेजज्ञान फॉउंडेशन द्वारे करण्यात येत आहे.