रुपाली रामटेके(मुलचेरा तालुका प्रतिनिधी)
लगाम:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. आरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगितली आणि त्यांच्या समृद्ध विचारधारेचा आदर्श विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली रामटेके होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य, श्रीमती अल्का कोडापे उपस्थित होत्या. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले आणि त्यांच्या कार्याच्या चांगल्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आकर्षक संचालन गुंड यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दहागावकर
यांनी केले.