गडचांदुर:किनवट ते चंद्रपूर प्रवासात असणारी बस क्रमांक MH34BT1941 राजुरा गोविंदपूर NH-7 वर गडचांदूर शहराजवळील जे पॅलेस बार समोर बस ने दुचाकी क्रमांक MH40CJ4212 होंडा या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार कान्हू डहाले वय ५० रा. गडचांदुर यांचा उपचारा दरम्यान गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला आहे
किनवट आगाराची बस दररोज किनवट ते चंद्रपूर भ्रमंती निघाली असता गडचांदूर जवळील जोगी पॅलेस समोर बस नी दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार कान्हू डहाले शेतातून घरी परततांना ही दुर्दैवी घटना बुधवार दिनांक १८ डिसेंम्बरला १२ वाजताच्या सुमारास घडली.
बस चालकाने दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नांना बस वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने असणारी बस उजव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला खाली उतरली परंतु नशीब बलवंत प्रवाशी किरकोळ जखमी झालेतयावेळी बस चालक सुधाकर सलाम वय -५० वर्ष जखमी असून बस मध्ये ३५ ते ४० प्रवाशी प्रवास करीत होते त्यातील सचिन कुलमेथे वय ३५ वर्ष हातलोनी इतर १२ प्रवाशी किरकोळी जखमी आहेत. ते ग्रामिण रुग्णालय गडचांदूर येथे उपचार घेत आहे .
यावेळी जोगी पॅलेसचे मालक शरद जोगी,गडचांदूर येथील युवक मयूर एकरे यांनी बस मधील प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात मदत केली.अपघात झाल्याची घटना माहिती होताच घटनास्थळी तात्काळ गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रवाश्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे उपचारासाठी पाठविले.