गोंडपीपरी-
गोंडपिपरी तालुक्यात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात श्री गणेशजींचे आगमन झाले आहे.कोरोनाचे सावट लक्षात घेता अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव पार पाडण्याचे आव्हाहन
रा.यु.कॉ गोंडपीपरी तालुका अध्यक्ष सुरज माडुरवार यांनी केले आहे.ज्या तरुण वर्गाकडे आपला समाज सामाजिक बांधिलकीचा अभाव म्हणून बोट दाखवताना दिसायचा ती तरुणाई सामाजिक कार्यात सक्रिय होताना गणेश उत्सवाच्या निमित्याने दिसत होती.रक्तदान,रक्त तपासणी शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर इत्यादींचे आयोजन केले जात होते.वेळप्रसंगी गरजुंना मदत करताना दिसायचे.यामागे समाजाचा पैसा समाजाच्या कामासाठी त्यांच्या प्रगतिसाठी वापरल्या जावा ही भावना आत्मीयता गणेश उत्सवाच्या माध्यमातून दिसून येत होती.या देशाच्या महाराष्ट्राच्या मातीत सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात झाल्यापासून प्रथमच निरबंधासह गनेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.परंतु उत्साह मात्र तोच आहे.
भारतीय संस्कृती ही विविधतेनी नटलेली आहे.काळाच्या ओघात अनेक विचारप्रवाह व चालीरीती या संस्कृतीत सामावलेल्या आहेत.तत्कालीन परिस्थितीचा सामना करत काही रूढी,परंपरा आजही चालत असलेल्या आपणास दिसत आहे.सामाजिक जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन उत्सवाच्या निमित्याने केले जात होते.
गणेशोत्सव हे जनमान्य उत्सव आहे.गणेशोत्सव म्हटलं तर युवकांमध्ये एक जोश ,उत्साह निर्माण होत असते.पन या उत्सवातून आपल्याला लाखात उलाढाल होताना दिसत होती.समाजाच्या भावना व श्रद्धा यांच्याशी जुळल्याने सामाजिक बांधिलकी व सामाजिक सलोखा राखण्यास हे उपक्रम साहाय्य ठरतील.
या उत्सवात व्यावहारीकपणा होत असताना दिसायचा.मंगल मांगल्याचा क्षण म्हणून रोषणाई तसेच शृंगार म्हणून डेकोरेशन व झगझगाट केली जायची.या दहा दिवसांत युवक आपल्या आवडी ,अपेक्षा ,छंद जोपासत असायचे.ग्रामिण भागात तर झिंगाट ,शांताबाई,अशा गाण्यावर नृत्य करून मनोरंजन करताना दिसायची.
देशात सद्यस्थिती समाधानकारक नाही.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक घटक हा अडचणीत आलेला आहे.कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.परंतु या कोरोनाने माणुसकी नक्कीच शिकवली बिमार से नही बिमारी से लढणा हे प्रमाणे.कुणी ना कुणी कुणाच्या मदतीला धावून जाताना दिसायचे.कुणी अन्न धान्य किट तर कुणी काही.परंतु माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागतात सर्व भारतीय दिसली.अनेक मंडळ लाखोंची उलाढाल गणेश उत्सवाच्या निमित्याने करायची सरकारने जी निर्बन्ध लावली त्यामुळे उत्सव अतिशय साध्या पद्धतीने व कमिखर्चात होताना दिसतोय.याच धर्तीवर लेकरांची दशा पाहून गणेश मंडळे याकामी आपले योगदान देऊ शकतात.गरजू लोकांना त्यांच्या कुटुंबियांना उत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून मदत करून आदर्श निर्माण करू शकतात.मातीतून मूर्ती साकारणाऱ्या त्या मातीतही देवीदेवतांचे रूप पाहणारे आपण त्या काळ्या मातीच्या लेकरांसाठी हे जरूर करू शकतो.याव्यतिरिक्त प्रत्येक गावात काही वानवा नाही.प्रदूष आहे,अस्वछता ,आरोग्याच्या अभाव,अंधश्रद्धा,भ्रषभ्रूनहत्या यांसारख्या समशा चा सामना करावा लागत आहे.या समश्यांच् विविध कृतिशील उपक्रमाचे आयोजन करून युवकांनी पुढाकार घ्यावा.गणेश मंडळांनी गाजावाजा न करता उत्सवाच्या माध्यमातून झालेली जमा रक्कम चांगल्या हेतूने वापरावी.ही प्रतिष्टीत समाजातील व्यक्तींची माफक अपेक्षा असते.ती अपेक्षा मंडळे पूर्ण करू शकतात.’थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक मंडळांनी आपले योगदान दिल्यास एक मोठा निधी समाजपियोग कामासाठी उपलब्ध होईल.
प्रत्येक व्यक्तीनीं मंडळांनी समाजपरिवर्तनाची ही वाट चालवावी.वाटेत येणाऱ्या समस्यां सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.अखेरीस ही वाट इतरांना दान करावी.या वाटेवर जाणाऱ्यांची संख्या वाढल्यास हे उपक्रम परिवर्तनीय नव्या समाजाची नांदी ठरतील यात शंका नाही.दोन दिवसापूर्वीपासून लालपरी धावायला लागली.ई पास शिवाय आता प्रवास करता येणार आहे.गणपत्ती बाप्पा अशाच सकारात्मक गोष्टी घडू द्या.कोणालाचे विघ्न पळवा या प्रार्थनेसह समस्त जनतेनी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा असे आव्हाहन इंडिया दस्तक नुज शी सवांद साधताना राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज माडुरवार यांनी केले आहे.आज सुरज माडुरवारांच्या घरी श्री गणेशजींचे साध्या पद्धतीने विधिवत रित्या विराजमान झाले आहे.