गडचिरोली/प्रतिनिधी रमेश कोरचा
कुरखेडा तालुक्यातील चांदागड ते डोंगरगाव या गावाच्या मधोमध असलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे दरवर्षी त्या भागातील जनतेला पावसाळ्यात खुप अडचणीला तोंड द्यावे लागते. जवळपास दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे डोंगरगाव,मोहगांव, उराडी, कोसी, वासी ,खपरी,कन्हारटोला,सोनेरांगी या गावचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात आवागमन होत असतो.तालुक्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कर्मचारी आपली सेवा बजवतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शाळेतील विध्यार्थी सुध्दा तालुक्याच्या ठिकाणी आपले शिक्षण घेण्यासाठी जात असतात. परंतु पावसाळ्यात कमी पावूस जरी असला तरी कमी उंचीच्या पुलामुळे पुलावरून पूर असतो.त्यामुळे तो मार्ग पुर्णपणे बंद पडलेला असतो.दरवर्षी हेच कारण असल्याने त्या भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.