गोंडपिपरी/आकाश चौधरी
तालुक्यातील वढोलीत शुक्रवारी अखेर कोरोनाने शिरकाव केला होता.एक कुटुंबातील आई व मुलगा कोरोनाबाधित निघाले होते.शुक्रवारी रात्री या संबंधाने ग्रामपंचायत ने गावात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाधित व्यक्तीच्या घराजवळील परिसल सील करून मंगळवार पर्यंत मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा आदेश दिला होता.कार्यक्रमानिमित्य राजुरा जाऊन काही दिवसांपूर्वी गावात परतले व घरी नुकतंच गणेश उत्सवाच्या निमित्याने पाहुणे मंडळी सुद्धा आली होती.आणि लगेच आई व मुलाला ताप ,सर्दी जाणवायला लागली लगेच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले.तेथील सेवेवर असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे दिसल्याने कोविड सेंटर मध्ये कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला.लागलीच आई व मुलानी कोरोना टेस्ट केली.काही तासाने त्यांचा अहवाल पॉसिटिव्ह आल्याने वढोलीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (दि.२८) दुपारी .बाधित कुटुंबियांच्या लगत असलेला परिसर सिल करण्यात आला होता गावकऱ्यांना सावधानतेचा ईशारा देण्यात आले.व कोरोना बाधित समरकात आलेंच्या 40 जणांचे टेस्ट घेण्यात आले.आज सोमवारी 31 ला रिपोर्ट आला आणि वढोलीत हाहाकार माजला तबल 23 जण कोरोना बाधित निघाले असून प्रशासन अलर्ट होऊन बाधितांना पुढील उपचाराकरिता नेण्यात येत आहे.पोलीस विभाग व महसूल विभागामार्फत गाव सिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.