हायकोर्टाचा निकाल
चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन
विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले आहे. पूर्व विदर्भात शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे जेईई आणि नीटसाठी तयारी केलेल्या 17 हजार विद्यार्थ्यांसमोर परीक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे.
न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा राज्य व केंद्र सरकारला केली होती. जिल्हा दंडाधिकारी यांना परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी हीच योग्य संस्था असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे . संपूर्ण परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. पूराचा फटका बसणारे विद्यार्थी परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती करु शकतात. पण ठरल्याप्रमाणे परीक्षा पार पडायल्या हव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रवासात अडचण असल्याने परीक्षेसाठी हजर राहू न शकणारे विद्यार्थी सादरीकरण करु शकतात. पण परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एनटीएच योग्य संस्था आहे. एनटीए जिल्हाधिकार्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ शकते न्यायालयाने सांगितले आहे.