सावली
वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी टाकल्याने सावली तालुक्यात नदी काठावरील सर्वत्र हाहाकार माजला आहे.
सावली तालुक्यातील अनेक शेती पाण्याखाली आहे.आज थोडा पूर ओसरला म्हणून सामदा येथील प्रगतशील शेतकरी रुपेश बुरले वय 40 वर्ष हे शेतात गेले. याचा संपूर्ण शेत पाण्याखाली होता तसेच मोटार पंप सुध्दा बुडून होता.
पाळीवर असलेले छोटे झाड तोडले.व त्या झाडावरील मोटार पंप च्या वायर ला उचलून बाजूला ठेवतो म्हणून हात लावताच त्यांना जोरदार करंट लागला व ते जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी 8 च्या दरम्यान घडली.घटनेची माहिती पोचताच शेकडो लोक घटनास्थळी पोहचले.
या घटनेचा सर्वत्र विलाप सुरू असून एक उमदा शेतकरी हरपल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली असून या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.