आष्ठी/गौरव वाट
. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आष्टी शहर वसले आहे. येथून जवळच असलेल्या ईल्लूर येथे मागील कीत्येक वर्षापासून पेपरमील आहे. त्यामुळे दीवसागणीक आष्टी शहर झपाठ्याने वाढत आहे. सोबतच अवैध धंदे करणार्यांचे जस्ते सुद्धा दिसून येत आहे. अश्यातच काही दिवसां पासून विजेचा अनियमित पुरवठा रात्री बेराञी होत असल्याने आवैधधंदे वाले याचा चांगलाच फायदा घेत आहे. विजेच्या होणाऱ्या लपंडावामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहे. त्याचप्रमाणे दिले जाणारे वाढीव बील या मुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.
दररोज दिवसातून वा रात्री दोन ते तीन तास विद्युत पुरवठाखंडित होत आहे. यामुळे लघुव्यावसायिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनाही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठयामुळे तर ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण गाव बराच वेळ अंधारात जात आहे.त्यामुळे विधुत पुरवठा सुरळीत सुरु ठेवन्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत विधुत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडन्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.