आज 29 कोरोनामुक्त तर नवीन 28 बाधित :अत्यवस्थ स्थितीत भरती झालेला ब्रह्मपुरी येथील 47 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
गडचिरोली/सतीश कुसराम
जिल्हयात आज 29 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 6, चामोर्शी येथील 21, सिरोंचा 1, व आरमोरी 1 असे एकूण 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर 28 नवीन कोरोना बाधितांमध्ये
गडचिरोली येथील 14 यात एक गरोदर स्त्री, सावली तालुक्यातील 2, स्थानिक 11 रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी येथील दोघे यात 1 आरोग्य कर्मचारी व 1 कोरोना बाधिताच्या संपर्कातील बाधित आढळून आले आहेत. वडसा येथील 5 जण यामध्ये इतर बाधितांच्या संपर्कातील 2, मागील 10 दिवसात लक्षणे आढळल्यानंतर सर्वेक्षणात आढळून आलेले 3 जण. कोरची येथील 3 प्रवासी कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुलचेरा येथील आरोग्य कर्मचारी 1 व 1 प्रवासी बधित आढळून आले आहेत. आहेरी येथेही 1 प्रवासी बाधित आढळून आला. तर चामोर्शी येथे 1 रूग्णाच्या संपर्कातील बाधित आढळला असे आज एकुण 28 नवीन कोरोना बाधित आढळले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 245 झाली असून एकुण बाधित संख्या 1329 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 1083 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा दुदैवी मृत्यू जिल्हयाबाहेर झाला आहे.
*ब्रह्मपुरी येथील 47 वर्षीय व्यक्तीचा गडचिरोलीत कोरोनामुळे मृत्यू*
दि.6 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वा. ब्रह्मपुरी येथील 47 वर्षीय ताप, झटके व श्वसनास त्रास असलेला रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती झाला. यावेळी तातडीने रूग्णालयाकडून उपचार प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी लक्षणे पाहून सदर रूग्णाची ट्रुनॅट तपासणी करण्यात आली. यावेळी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यादरम्यान सदर रूग्ण अत्यावस्थ असल्याने उपचार सुरू होते. साधारण त्याच दिवशी म्हणजे दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वा. प्रकृति बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
या दरम्यान कोरोना बाबत अधिक पडताळणीकरीता त्याचे नमुने आरटीपीसीआर तपासणी करणेकरीता घेण्यात आले होते. त्याचे अहवाल काल रात्री (दि.7 सप्टेंबर रोजी) प्रशासनाकडे प्राप्त झाले. सदर रूग्ण कोरोना या संसर्गामूळे मृत्यू पावला हे आरटीपीसीआर तपासणी नंतर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच सदर रूग्ण चंद्रपूर जिल्हयातील असल्याने तसेच बाधितही जिल्हयाबाहेर झाला असल्याने त्याची नोंद चंद्रपूर जिल्हयात झाली आहे. तसेच सदर मृत रूग्णाची पत्नी यावेळी सोबत होती तिचाही अहवाल आरटीपीसीआर तपासणीत सकारात्मक मिळाला आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या प्रशासनास कळविण्यात आले आहे. मृत कोरोना बाधिताचा अंतिम विधी जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून गडचिरोली येथे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार करण्यात आला.