बहूतांश राजकारणी श्रेय वादाने पछाळलेले असता. हात पाय न हलविता आपसूकच प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यासापोटी सक्रीय पदाधिकारी अन कार्यकर्त्यावर धूळ उडविण्याचे कु कारस्थान प्रामाणिकपणे पार पाडीत असतात.अशी निष्क्रिय अन कामचूकार नेत्यांचा अघोरी कृत्यांनी मात्र प्रामाणिक राजकारकारण्याचा बळी जात असतो. हे राजकीय पक्षासाठी अन सर्वसामान्यांसाठी अतिशय घातक ठरणारे आहे. जनतेशी आणि पक्षाशी प्रामाणिक असलेल्या नेत्यांना बुक्यांचा माराची गरज नाही.ही माणसे स्वाभिमानी असतात.शब्दांनी सूध्दा ती माणसे घायाळ होतात.गोंडपिपरी तालुक्यातील राजकारण मागिल दहा वर्षापासून मी जवळून बघत आलो आहे. इथल्या राजकारणात सक्रीय अन निष्क्रिय नेते आहे.कुरघोडी करणारे,अकारण दुसार्यावर चिखल उडविणारे,पाय ओढण्यात मास्टर डीग्री असलेल्यांची इथे रांग मोठी आहे. तोंडावर मिठू सारखे गोड गोड बोलणारे अन मागुन हळूच चोच मारणारे महाधूर्त व्यक्तीमत्वाचे धनीही आहेत. सामान्यांचा प्रश्नावर आक्रमक होणारे,त्यांचासाठी झटणारे अन वेळ प्रसंगी शासनाचा विरोधात निडरतेने उभे होणारे अन अनेकांचा पसंतीत उतरलेले फारच कमी नेते आहेत. त्यातील एक नाव आहे सूरज माडूरवार.
पडत्या काळात तालुक्यात पक्षाची बाजू सावरली.सातत्याने नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या कायम पेलल्या.पक्षाशी खंबिर कार्यकर्ते जोडत संघटन वाढविले.जनसामान्याचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रसंगी आंदोलने उभारली.सारचं आॕल इज वेल सूरू असतांना अचानक समाजमाध्यमामध्ये राजीनाम्याचे वृत्त झळकले.या शाॕकींग न्यूजने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.आतील गाठ नेमकी काय ? हे कळू शकले नाही मात्र सूरजची दिवसेंदिवस वाढणारी प्रसिद्धी,वाढता जनसंपर्क अनेकांसाठी पोटदुखी ठरली अशी चर्चा तालुक्यात सूरू आहे. जे घडलं किवा जे घडत आहे ते तालुक्याचा राजकारणासाठी हीताचे नाही.निवडणुकीचा तोंडावर निवेदनाचा पाऊस पाडणारे अन जनतेला भुलथापा देणारे अनेक सापडतील मात्र लोकांसाठी हवे तेव्हा धावून जाणारे सूरज सारखे फार व्यक्तीमत्व तालुक्यात आहेत.आज जे काही सूरू आहे,ते अयोग्य आहे,असे माझे व्यक्तीगत मत आहे.
काहींचा आक्षेप असाही असू शकेल,मित्रप्रेमापोटी माझा आटापिटा सूरू आहे. हा आक्षेप शंभर टक्के खोटा आहे असे मि म्हणणार नाही.मात्र शंभर टक्के खरा आहे असेही नाही. सूरजची राजकीय जडणघडण याची डोळा,याची देह बघीतली आहे.पक्षाने डावलले तरी फिनीक्स पक्षासारखा सूरज पुन्हा ताट उभा होईल,यात तिळमात्र शंका नाही.
निलेश झाडे