गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी -नितेश खडसे
कोरची येथील गोंडी भाषा, संस्कृतीचे गाढे अभ्यासक रमेश कोरचा यांचा आज गोंडवाना दर्शन फेसबुक लाईव मधे संध्याकाळी सात वाजता व्याख्यान आयोजित केले आहे.रमेश कोरचा गोंडी भाषेचे अध्ययन करून गोंडी भाषेला जागतिक स्तरावर दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे असे म्हणने आहे की, गोंडी भाषा ही द्रविड पूर्व भाषा असुन जगातील सर्व भाषेची जनणी आहे.गोंडी संस्कृती विज्ञाननिष्ठ संस्कृती असल्याने तिचे प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे.देश विदेशातील चौदा हजार सदस्य जोडलेल्या गोंडवाना दर्शन फेसबुक लाईव मधे आज संध्याकाळी सात वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यान बघण्यासाठी फेसबुक ला गोंडवाना दर्शन असे सर्च करून वाख्यानाच आस्वाद घ्यावा असे आव्हान गोंडवाना दर्शन चे संपादक साहित्यिका उषाकिरण आत्राम, संपादक सदस्य शताली शेडमाके, बिच्चु वड्डे, रमेश कासा,कमलेश गोंड,नंदकिशोर नैताम, प्रविन मंडावी यांनी केले आहे.