आज 115 जण कोरोनामुक्त
गडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम
आज कोरोनामुळे 2 मृत्यूंसह जिल्हयात 134 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. तसेच आज 115 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4760 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3917 वर पोहचली. तसेच सद्या 806 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 39 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 2 मृत्यू मध्ये 34 वर्षीय पुरूष चामोर्शी येथील असून दुसरा 35 वर्षीय पुरुष हा चंद्रपूर जिल्हयातील आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.89 तर मृत्यू दर 0.82 टक्के झाला.
नवीन 134 बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 28, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 18, धानोरा 3, एटापल्ली 2, कोरची 7, कुरखेडा 7, मुलचेरा 9, सिरोंचा 2 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 115 रूग्णांमध्ये गडचिरोली 40, अहेरी 29, आरमोरी 18, भामरागड 3, चामोर्शी 6, धानोरा 11, एटापल्ली 7, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 7 जणांचा समावेश आहे.
नवीन कोरोना बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 46 मध्ये साईनगर धानोरा रोड मधील 2, मेडिकल कॉलनी 3, सोनापुर कॉम्प्लेक्स 4, गोंडवाना युनिर्व्हसिटी एमआयडीसी रोड 1, वनर्षी कॉलनी 1, इंदिरानगर 1, इतर स्थानिक 2, नवेगाव 3, रामपुरी वार्ड 1, चामोर्शी रोड 2, रामनगर 3, आयटीआय चौकाजवळ 3, आरमोरी रोड 1, गणेश नगर 1, अयोध्यानगर 3, पीरानी स्टील ट्रेडर्स जवळ 1, डोंगरगाव 1, आनंदनगर 1, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 1, गोगांव 1, कॅम्प एरिया 2, सर्वोदय वार्ड 1, पारडी 1, गुलमोहर कॉलोनी 1, गोकुलनगर 1, जलाराम मार्केटिंग चंद्रपूर रोड जवळ 1 यांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 22, वेलगुर 1, महागाव 1, मानवमंदिर वार्ड नं.4 जवळ 2, नागेपल्ली 1, आलापल्ली मधील 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, देऊळगांव 1 जणाचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3 जणाचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये वागधरा येथील 1, स्थानिक 3, मार्कंडा येथील 2, आष्टी 8, अंबोली 1, श्री साई मेडिकल 1, कुनघाडा 1, लक्ष्मणपुर 1 जणाचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये मेंढाटोला 1, स्थानिक 1, मुरुमगाव 1 जणाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2 जणाचा समावेश आहे. कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, बोटेकसा 1 जणाचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये पुराडा येथील 1, कढोली 1, कुराडा 1, स्थानिक 2, गोठनगाव 1, देऊळगाव 1, गांधीनगर 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये भगतनगर 1, सुंदरनगर 3, कोपरर्ली 1, हरीनगर 1, बोलेपल्ली 1, लोहारा 1, गोमणी 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, गारकापेठ 1 जणाचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 1, किदवई वार्ड 1, स्थानिक 2 जणाचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील 2 जणांचाही समावेश आहे.