चंद्रपूर:
जिल्ह्यात मागील २४ तासात ८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १६५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तसेच दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ६६९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ४३४ झाली आहे. सध्या १ हजार ९५३ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ९२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १६ हजार ४४० नमुने निगेटीव्ह आले आहेत.
रविवारी मृत झालेल्या बाधितामध्ये विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा येथील ८० वर्षीय महिला व कोसारा चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६२ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपूर:- मागील २४ तासात १६५ नवे कोरोनाबाधित तर ८५ जणांनी केली कोरोनावर मात…
RELATED ARTICLES