प्रतिनिधी/सतीश कुसराम
गडचिरोली
गडचिरोली नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या गटार लाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पोलीस विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन केली .यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार
गडचिरोली शहरात मागील वर्षी गटार लाईनच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे या कामाला लागणारी उर्वरित निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून दिल्यास सदर काम लवकर मार्गी लागेल व शहरात असणारे विकासकामे पूर्ण होण्यास मदत मिळेल त्यामुळे याकरिता निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली.
महापुर, दुष्काळ, वादळ वारा व रोग किड यामुळे शेतकऱ्यांची पीक पूर्णतः नष्ट झाली यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात पीक नाही त्यामुळे पिके नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत देण्याची घोषणा केली होती, परंतु अजूनही त्या मदतीची पूर्तता राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तातडीने देण्यात यावी अशी विनंती केली
लाकडाऊन च्या काळात राज्य शासनाने जनतेवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा बसविला, वीज बिलामध्ये माफी देण्यात येईल अशी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला आश्वासन दिले होते. परंतु अजून पर्यंत जिल्ह्यातील जनतेला वीज बिलामध्ये सूट देण्यात आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये शासनाविषयी प्रचंड संताप आहे .सदर वीजबिल तातडीने माफ करण्यात यावे त्यामध्ये सूट देण्यात यावी अशी विनंती त्यांनी यावेळी मंत्रि महोदयांना केली.
त्याच प्रकारे जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न, त्याकरिता लागणारा निधी ,जिल्ह्यातील रस्ते विकासाचे कामे, उद्योग विषयक कामे अशा विविध समस्यांवर त्यांनी चर्चा करून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यास संदर्भात आपण लक्ष द्यावे अशी विनंती या भेटी दरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली